"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 06:53 PM2020-08-16T18:53:23+5:302020-08-16T19:41:32+5:30

राज्यातील सत्ताधारी पक्षापैकी एक असलेल्या शिवसेनेला नाव न घेता मारला टोला..

Those who claim to be the successors of Chhatrapati Shivaji Maharaj are afraid to bring their thoughts: Governor Bhagat Singh Koshyari | "छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी दिली शिवनेरी किल्ल्याला भेट

जुन्नर : शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून राज्यातील तसेच देशातील जे कोणी स्वत:ला म्हणून घेत असताना ते  घाबरत असतील, तर मी म्हणतो ते शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी नाहीत. राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊन उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये, असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लावला.  

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी किल्ले शिवनेरीला भेट दिली. कोश्यारी यांनी पायी गड सर केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोश्यारी म्हणाले, की राज्यात आणि देशात शिवरायांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक जण मिरवत असतात. मात्र, त्यांचे विचार आत्मसात करताना घाबरतात. अशांनी स्वत:ला उत्तराधिकारी म्हणून घेऊ नये, असे म्हणत शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्याला टोला लगावला. 

कोश्यारी म्हणाले, राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला दत्तक दिला पाहिजे. असे झाले तरच राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन होईल, असे कोश्यारी म्हणाले. राज्यपालांचे वय लक्षात घेता प्रशासनाने त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. परंतु त्यांनी कोठेही न थांबता, भर पावसात छत्री तसेच रेनकोट न घेता तरुणांना लाजवेल अशा जोशात शिवनेरी सर केला. कोरोना प्रतिबंधक काळात विशेष परवानगी म्हणून राज्यपालांच्या भेटीसाठी किल्ले शिवनेरी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले होते.

Web Title: Those who claim to be the successors of Chhatrapati Shivaji Maharaj are afraid to bring their thoughts: Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.