शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बहिणींवर आभाळमाया !

By admin | Updated: August 18, 2016 18:15 IST

माणुसकी संपली.. लोप पावली.. असे शब्द वारंवार कानावर येतात. मात्र, हे पुर्णत: सत्य नाही, याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने घालून दिला.

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 18 : माणुसकी संपली.. लोप पावली.. असे शब्द वारंवार कानावर येतात. मात्र, हे पुर्णत: सत्य नाही, याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने घालून दिला. आई-वडिलांविना पोरक्या असलेल्या दोन बहिणींचा संघर्ष ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर या बहिणींसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले आणि अवघ्या काही दिवसांत तब्बल सव्वानऊ लाख रुपये जमा झाले. आता त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी या बहिणींना घर बांधून देण्याचे रक्षाबंधनादिवशी जाहीर केले.

गोवर्धनवाडी येथील निकिता आणि पूजा या बहिणी आई-वडिलाच्या मृत्यूनंतर दोघीच एकत्रित राहतात. घरखर्च तसेच शिक्षण घेण्यासाठी आठवड्यातील काही दिवस मोठी बहीण निकिता मजुरीवर जात होती. या बहिणींचा हा संघर्ष ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे आले. ढोकी, उस्मानाबाद एवढेच नव्हे तर पुणे, मुंबई, सोलापूर, जळगाव, दौंड, तासगावसह अनेकांनी या बहिणींना सर्वतोपरी मदत दिली. या बहिणींची ही व्यथा माहिती झाल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी निकिता आणि पूजा यांची भेट घेऊन १ लाखांची मुदतठेव त्यांच्या नावे केली.

याबरोबरच प्रकाश महाजन (औरंगाबाद), आ. विक्रम काळे, भाई उध्दवराव पाटील शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्था, ढोकीचे सपोनि किशोर मानभाव, सोलापूर येथील महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू नानवरे, सेवानिवृत्त सपोनि दिगंबर मैंदाड, चंद्रकांत देशमुख, माणिक माळी, सरपंच बाळासाहेब देशमुख (पाटोदा), अनिकेत लोहिया (अंबाजोगाई), होळणा नदी पुनरूज्जीवन समितीचे अध्यक्ष गोविंद जामदार, मुंबई येथील प्रा. गजानन शेजवळ, पुणे येथील जितेंद्र बोरा, शिवानंद साखरे, ढोकी येथील संग्राम देशमुख, किसन तात्या समुद्रे फौंडेशन, हरिदास फेरे, डॉ. क्रांती गायकवाड, समीर पठाण, नवनाथ गाढवे आदींनीही या बहिणींचे घर सावरण्यासाठी पुढाकार घेतला. ‘लोकमत’ने सदर बहिणींचे वृत्त प्रसिध्द केले तेव्हा या बहिणी स्टोव्हवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र होते. हे पाहिल्यानंतर ढोकी येथील वंदना भारत गॅस एजन्सीच्या जोतीबा धाकपाडे यांनी या बहिणींना सिलिंडरसह गॅस कनेक्शन दिले.

एवढेच काय निकिता ज्या शाळेत शिकते तेरणा साखर कारखाना प्रशालेतील शिक्षकांनी दर महिन्याला वर्गणी गोळा करून निकिताला चार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला तर याच प्रशालेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळालेली रक्कम साठवून निकिताला आर्थिक मदत केली. पाहतापाहता अवघ्या काही दिवसांत तब्बल सव्वानऊ लाखांची मदत या बहिणींच्या खात्यावर जमा झाली.

वळेकर यांनी दिली घरासाठी जागा‘लोकमत’मधून या बहिणींचा संघर्ष पुढे आल्यानंतर मूळचे गोवर्धनवाडी येथील असलेल्या नानासाहेब भागवत वळेकर यांनी गोवर्धनवाडीतील त्यांच्या राहत्या घराची जागा गोवर्धनवाडीचे सरपंच विनोद थोडसरे यांच्या माध्यमातून या बहिणींच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. वळेकर हे दौंड येथे स्थाईक असून, त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. वळेकर यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी आईचा मृत्यू झाला. त्यामुळे वळेकरांचा सांभाळ दौंड येथील आजी व आत्यानेच केला. तेथेच मोठे झाल्यानंतर ते आजीचा भाजी व्यवसाय सांभाळत आहेत. निकिता आणि पूजा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर या बहिणी ज्या दु:ख भोगत आहेत, तेच दु:ख भोगलेल्या वळेकर यांनी आपल्या राहत्या घराची जागा या बहिणींच्या नावे लिहून दिली. आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी याच जागेवर घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘त्या’ बहिणींच्या मागे महाराष्ट्र उभा - मुंढे‘लोकमत’ने निकिता आणि पूजा या बहिणींचा संघर्ष महाराष्ट्रासमोर आणला. या दोघी मूळच्या आमच्या केज तालुक्यातील. या बहिणींच्या मदतीसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी पुढाकार घेतला. विदारक परिस्थिती असतानाही त्याच्याशी दोनहात करीत या बहिणी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी गोवर्धनवाडीतील त्यांच्या जागेवर घर बांधून देण्याचा निर्णय मी घेतला आहे. येत्या आठवडाभरात या घराचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, असेही विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.