शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कोळसा वाहतूक कंपन्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 31, 2015 05:15 IST

प्रदूषणाबाबत वाढत्या तक्रारीची दखल घेत खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच गुरुवारी नियमबाह्य कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून कारवाईत पुढाकार घेतला

चंद्रपूर : प्रदूषणाबाबत वाढत्या तक्रारीची दखल घेत खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच गुरुवारी नियमबाह्य कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून कारवाईत पुढाकार घेतला. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या २२ ट्रक्सना चालान करीत संबंधित कंपन्यांवर शुक्रवारी पर्यावरण संरक्षक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या ट्रक्सची वहन क्षमता व कागदपत्रांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नियमबाह्य कोळसा वाहतुकीची तक्रार आली होती. याची दखल घेत कदम वेकोलिच्या दुर्गापूर कोळसा खाणीत धडकले. येथे कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषण होत असल्याचे त्यांनाही आढळून आले. वे-ब्रीजजवळ ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक करणारे १९ ट्रक त्यांनी अडविले. त्यानंतर पद्मापूर खाणीतून कोळसा वाहतूक करणारे ३ ट्रकही अडविण्यात आले. गुरुवारी रात्री या २२ ट्रकचे वजन घेण्यात आले. ओव्हरलोड असल्याचे आढळून आल्यानंतर या ट्रक्सना दुर्गापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुर्गापूर पोलिसांनी कोळसा वाहतूक करणाऱ्या हेमकुण्ड व शंखमुगम या खासगी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)