शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:56 IST

Ambernath Municipal Corporation :अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान, या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर अशी आघाडी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तर काँग्रेसनेहीभाजपासोबत आघाडीचा निर्णय घेणारे स्थानिक नेते प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आता काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांनी थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान, या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या अंबरनाथमधील नगरसेवकांमध्ये अंबरनाथमधील स्थानिक नेते प्रदीप नाना पाटील यांचाही समावेश आहे. प्रदीप पाटील यांच्यासह दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल  देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रदीप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्यांच्यासह या १२ नगरसेवकांनी निलंबनाच्या कारवाईनंतर थेट भाजपामध्ये प्रवेश करणं हा अंबरनाथमधील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ambernath's 12 Suspended Congress Corporators Join BJP After Uproar

Web Summary : Following suspension for allying with BJP, Ambernath's 12 Congress corporators, including local leader Pradeep Patil, joined BJP in presence of Ravindra Chavan and Ganesh Naik. The move follows earlier denial of alliance by CM Fadnavis.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाcongressकाँग्रेसambernathअंबरनाथMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ravindra Chavanरविंद्र चव्हाण