शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:21 IST

Maharashtra News: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद पेटलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या भाषावादाबाबत, मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्येमराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद पेटलेला आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे हा वाद भडकला होता. तसेच अखेरीस जनक्षोभामुळे सरकारला पहिलीपासून मराठी शिकवण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. दरम्यान, आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या भाषावादाबाबत मोठं विधान केलं आहे. आपण अशाप्रकारे द्वेष पसरवत राहिलो तर इथे येऊन कोण गुंतवणूक करणार, यामधून आपण राज्याचं दीर्घकालीन नुकसान करत आहोत. आपल्याला मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. तसेच आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेच असे राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.

एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना तामिळनाडूमधील एका घटनेची आठवण सांगत राधाकृष्णन यांनी भाषावादावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी तामिळनाडूमधून खासदार होतो, तेव्हा एकेदिवशी मी काही लोक कुणाला तरी मारहाण करत असल्याचे पाहिले. मी त्यांना त्यांची अडचण विचारली तेव्हा ते हिंदीत बोलत असल्याचे समजले. मग ते लोक तामिळ भाषेत बोलत नव्हते. तसेच तामिळ भाषेत बोलावं यासाठी त्यांना मारहाण करण्यात येत होती, असे मला हॉटेल मालकाने सांगितले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले, जर आपण अशाप्रकारे द्वेष पसरवला. तर इथे येऊन कोण गुंतवणूक करणार? अशाने आपण महाराष्ट्राचं दीर्घकालीन नुकसान करत आहोत. मला हिंदी भाषा समजत नाही. माझ्यासाठी हा एक अडथळा आहे. आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. तसेच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात भाषावाद तीव्र झाला असताना राज्यपालांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण असून, त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईhindiहिंदी