शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:40 IST

ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे.

शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रामुख्याने युतीत काही बिनसले की काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना फडणविसांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचे बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही', असे म्हटले आहे.  

"ये फेविकॉल का जोड है..."एकनाथ शिंदे म्हणाले, माझी आणि देवेंद्रजींची मैत्री आताची नाही. ती गेल्या १५ -२०  वर्षांपासून आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचं बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही.' तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, तुटणार नाही. काही लोक म्हणतात ही जय विरूची जोडी आहे. काही म्हणतात धरम-वीरची जोडी आहे. पण मी सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ती खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही आणि जे स्वार्थासाठी  एकत्र आले होते. त्यांना या जनतेनेच बाजुला करून टाकले आहे." 

आम्ही 'तो' मिठाचा खडा खड्यासारखा काढून टाकला -"ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे. बाळासाहेब आणि अटलजींचे विचार, प्रमोद जी, गोपिनाथ जी असतील आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. यात गेल्या वर्षापूर्वी टाकला होता पण आम्ही तो मिठाचा खडा खड्यासारखा काढून बाजूला टाकला आणि भक्कम युती झाली. लोकांच्या मातलं सरकार आम्ही स्थापन केलं. यामुळे कितीही कुणी म्हटलं तरी आमच्यात कसल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ शकत नाही. काहण हे एका विचाराचं सरकार आहे," असेही शिंदे म्हणाले. 

...त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना 84 टक्के लोकांची पसंती - एवढेच नाही, तर "२०१९ रोजी सर्वसामान्यांनी शिवसेना भाजप युतीला मतदान केलं. पण सरकार वेगळ्याच लोकांबरोबर स्थापन झालं. पण गेल्या १०-११ महिन्यांपूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि या राज्यात सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. यामुळे राज्य सरकारला काही लोक पसंती देत आहेत. राज्य सरकार लोकांनी पसंत केलंय. पण मला, या गोष्टीचा आनंद आहे की, त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना तब्बल 84 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या देशाचा सन्मान जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे," असेही शिंदे म्हणाले  

...याचा अभिमान आम्हाला अधिक -"सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि ते केवळ देशातच नाही, तर संपूर्ण जगात आज लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा अभिमान आम्हाला अधिक आहे. यामुळे सत्ता वैगेरे यांचा कुणालाही मोह नाही. हा एकनाथ शिंदे काय? देवेंद्र फडणवीस काय? आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही करत आहोत आणि उद्याही करत राहणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही. आमचे पाय आजही जमिनीवर आहोत," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpalgharपालघरBJPभाजपाShiv Senaशिवसेना