शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचार थांबेना..

By admin | Updated: June 5, 2014 00:12 IST

उत्तर प्रदेशातील बदायूँ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने अख्खा देश स्तब्ध होऊन जगभर चिंता व्यक्त होऊ लागली असतानाही महिला अत्याचारात मात्र अजिबात खंड पडलेला नाही.

देशभर संताप : मेघालयात बलात्कारास विरोध करणा:या महिलेला गोळ्या घातल्या; उत्तर प्रदेशात सत्र सुरूच
 
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बदायूँ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने अख्खा देश स्तब्ध होऊन जगभर चिंता व्यक्त होऊ लागली असतानाही महिला अत्याचारात मात्र अजिबात खंड पडलेला नाही. उलट बदायँूसारख्याच क्रूर घटना घडत असल्याने समाजमन हेलावून गेले आहे. उत्तर प्रदेशात बंदुकीच्या धाकावर मुलीवर बलात्कार करण्यात आला, तर मेघालयात बलात्कारास विरोध करणा:या महिलेची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 
मेघालयच्या दक्षिणी गारो पर्वतीय जिल्ह्यात राजा रोंगटमध्ये संशयित अतिरेक्यांनी एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच अतिरेक्यांनी तिची डोक्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.
सदर महिला मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पती आणि मुलांसह आपल्या घरात होती. त्याचवेळी गारो नॅशनल लिबरल आर्मीचे (जीएनएलए) चार ते पाच सशस्त्र अतिरेकी तिच्या घरात घुसले. पती आणि पाच मुलांना घरात कोंडून ठेवून या महिलेला त्यांनी घराबाहेर खेचले. मारपीट करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रय} केला आणि याला विरोध करताच अगदी जवळून तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या. ज्यामुळे तिच्या डोक्याचे दोन तुकडे झाले. पोलीस महासंचालक (मोहीम) जी.एच.पी. राजू यांनी बुधवारी येथे या घटनेची माहिती दिली. दरम्यान, गारो पर्वतीय क्षेत्रचे प्रतिनिधित्व करणारे खासदार पी. ए. संगमा यांनी या घटनेची निंदा करताना क्षेत्रत कायदा आणि व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याचे मत व्यक्त केले आहे.  (वृत्तसंस्था)
 
बंदुकीच्या धाकावर मुलीवर बलात्कार
4संभल(उ. प्र.)- उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात नखासा परिसरात बंदुकीचा धाक दाखवून एका मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
4पोलीस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार फिरोजपूर गावात बुधवारी सकाळी 15 वर्षाची ही मुलगी तिच्या शेतात शेण वेचायला गेली होती. त्याचवेळी गावातील कासीम नामक इसम तेथे पोहोचला आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.