तेरावी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया १४ जूनपासून
By Admin | Updated: June 10, 2016 05:16 IST2016-06-10T05:16:49+5:302016-06-10T05:16:49+5:30
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला म्हणजेच तेरावीच्या प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणीला १४ जून २०१६ पासून सुरुवात

तेरावी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया १४ जूनपासून
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला म्हणजेच तेरावीच्या प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणीला १४ जून २०१६ पासून सुरुवात होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवीच्या अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ँ३३स्र://े४े.ल्ली३.्रल्ल या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी एन्ड आय), बीकॉम (ए एन्ड एफ), बीकॉम (एफ एन्ड एम) बीएमएस, बीएमएस- एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व नोंदणी करता येईल. (प्रतिनिधी)