शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात होऊ शकते तिसरी महानगरपालिका

By admin | Updated: April 2, 2015 04:53 IST

पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करायचा की, स्वतंत्र महापालिका बनवायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.

मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करायचा की, स्वतंत्र महापालिका बनवायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र या सर्व गावांचे क्षेत्रफळ पुणे महानगरपालिकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ३४ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करता येऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. पुणे पालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कॉंग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, समािवष्ट करण्यात येणाऱ्या ३४ गावांंच्या यादीत यापूर्वी वगळण्यात आलेल्या २७ पैकी १५ गावांचा समावेश आहे. तसेच या ३४ गावांच्या समावेशाचा प्रस्ताव सध्या ग्रामविकास विभागाकडे आहे. सुनावणीसाठी तो खुला करण्यात आला आहे. नगरविकास विभागाने अद्याप या गावांच्या समाविष्टतेबाबत कोणताही निर्णय केलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिकांचा रिजनल प्लॅन तयार करण्यात आलेला नाही. या पाश्वर्भूमीवर सर्व महापालिकांचे रिजनल प्लॅन तयार करण्याचे आदेश त्वरीत देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)