शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

Baramati Vidhan Sabha: "चूक काय झाली, याचा विचार करून..."; शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:56 IST

Sharad Pawar Ajit Pawar Baramati Vidhan Sabha 2024 : अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांना नाव न घेता लक्ष्य केले. त्यावरून आता शरद पवारांनी काही उलट प्रश्न केले आहेत.

 Sharad Pawar on Ajit Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाक्'युद्ध' सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनीशरद पवारांना नाव न घेता लक्ष्य केले. अजित पवारांच्या टीकेले आज शरद पवारांनी उत्तर दिले. भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्री पद कशाला घेतलं? असा उलट सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला. 

युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुरूवात कान्हेरी येथे शरद पवारांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांना नामोल्लेख न करता घेरलं. 

लोकांमध्ये राहायचं पण मंत्रिपद घ्यायचं नाही -शरद पवार

शरद पवार म्हणाले, "तुम्ही मला खुपदा मंत्री केलं. चारदा मुख्यमंत्री काय साधी गोष्ट आहे का? देशाचा संरक्षण मंत्री, देशाचा शेती मंत्री (कृषि मंत्री), आणखी काय द्यायचं लोकांनी?  म्हणून मी निर्णय घेतला की, लोकांच्यात राहायचं पण मंत्रि‍पदाची अपेक्षा करायची नाही."

"जवळपास तीन वेळा लोकांनी आमच्या विचारांचं सरकार निवडून दिलं. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं? प्रश्न माझ्यापुढे यायचा. आम्ही चर्चा करायचो, चार वेळा उपमुख्यमंत्री बारामतीचा, एकदा नव्हे चार वेळा आणि आपल्या पक्षाचा. पाचव्यांदा यांना पहिल्यांदा भाजपवाल्यांची मदत घेतली", असे खडेबोल शरद पवारांनी सुनावले.

त्यांच्या मदतीने पद कशासाठी घेतलं? शरद पवारांचा सवाल

शरद पवार पुढे म्हणाले, "काय कारण होतं? भाजपवाल्यांनी मतं दिली? पाच वर्षांपूर्वी लोकसभा, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी भाजपवाल्यांनी मते दिली नव्हती. तुम्ही दिली होती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिली होती. असं असताना त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतलं?", असा उलट सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला. 

"लोकशाहीमध्ये पद लागतं लोकांची सेवा करायला, पण लोकांची साथ त्यामध्ये कमी असेल, तर आपली चूक काय झाली? कमतरता काय राहिली याचा विचार करून सुधारणा करून लोकांचा विश्वास संपादन करायचा. मी अनेक वेळा विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेकदा सत्ता माझ्या हातात नव्हती. पण, त्यामुळे लोकांची साथ कधी सोडली नाही", अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार