शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 12:40 IST

ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे.

मुंबई - तुकाराम मुंढे अन् बदली हे जणू समीकरणच बनले आहे. प्रशासकीय सेवेतील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून मुंढेंचा उल्लेख केला जातो. कडक, शिस्तप्रिय आणि धोरणी स्वभावामुळेच मुंढे अन् स्थानिक राजकीय नेते असा वाद रंगतो. शासन अन् प्रशासनाच्या या वादातूनच मुंढेंच्या बदलीचा प्रवास सुरू होतो. मुंढें यांची त्यांच्या 12 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही बारावी बदली आहे. 

ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. सन 2005 च्या बॅचचे आएएएस असलेल्या मुंढेनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या प्रशासकीय कामाला सर्वप्रथम सुरुवात केली. विशेष म्हणजे सोलापूर येथे प्रोबेशनरी म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर, मेळघाटातील धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर, नांदेडचे उपजिल्हाधिकारी म्हणून ते नियुक्त झाले. तर 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर सीईओ म्हणून त्यांनी कार्यभार स्विकारला. नागपूरवरुन 2009 मध्ये थेट नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर, मुंबईत केव्हीआयसीच्या सीईओ पदाचा पदभार त्यांनी घेतला. 

मुंबईनंतर पुन्हा जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर 2011-12 साली त्यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा सोलापूरकरांना त्यांचा सहवास लाभला. त्यानंतर, 2012 मध्ये मुंबईच्या विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी त्यांनी पदभार स्विकारला. तर 2016 मध्ये नवी मुंबई महापालिकेत आयुक्त झाले. तेव्हापासून त्यांची चारवेळा बदली करण्यात आली आहे. नवी मुंबईतून त्यांची बदली केल्यानंतर 29 मार्च 2017 साली त्यांना पुणे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली. तेथून त्यांची थेट नाशिकचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. आता, नाशिकहूनही त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांना कुठलाही पदभार देण्यात आला नाही. त्यामुळे सोलापूरपासून बदलीचा प्रवास सुरू केलेल्या मुंढेंना सरकार आता तुकाराम मुंढेंना कोठे पाठवणार हे, सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashikनाशिकTransferबदलीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका