शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात होणार बरेच बदल : सुहास मर्चंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:41 IST

कोरोना विषाणूच्या विरोधात होत असलेल्या लढाईत ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय काही अटींवर सुरू करण्यास संमती

ठळक मुद्दे भविष्यात बांधकाम क्षेत्राला अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागणार बांधकाम व्यावसायिक बदलासाठी तयारबांधकाम व्यवसायिक, मजूर व क्षेत्राशी निगडीत अनेकांसाठी संकटाचा काळ असणार

पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात होत असलेल्या लढाईत ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय काही अटींवर सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच संमती दिली आहे. मात्र त्यासाठीच्या अटी,शर्थींमधून बांधकाम क्षेत्रात बरेच बदल होतील, त्या बदलांचा अभ्यास करून आम्ही त्यासाठी तयार झालो आहोत असे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितले.बांधकाम मजुरांची बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच राहण्या जेवणाची व्यवस्था, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, त्यांच्यात काम सुरू असताना ठेवायचे शारीरिक अंतर अशा अनेक अटी सरकारने घातल्या आहेत. त्यांचे पालन करणारांनाच बांधकामांच्या त्यांच्या साइटस सुरू करता येणार आहेत.याविषयी लोकमत बरोबर बोलताना क्रेडाईच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले,  भविष्यात बांधकाम क्षेत्राला अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागणार आहे. या काळात बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, त्यांची सुरक्षितता, त्यांना उपलब्ध सोयी सुविधा यांसारख्या बाबींवर तातडीने काम करण्याची गरज होती. ती ओळखून आम्ही मध्यंतरी आमच्या ४५० सदस्यांचे एक वेब सेमिनार घेतले. त्यात या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे आम्ही आता या बदलांना तयार आहोत. 

क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, सचिव आदित्य जावडेकर, बांधकाम कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आय. पी. इनामदार, तसेच पराग पाटील, अर्चना बडेरा, सपना राठी, यश भंडारी, समीर पारखी यांबरोबर अनेक सभासद या वेबिनारमध्ये होते.मर्चंट म्हणाले, बांधकाम मजूर हा बांधकाम व्यवसायाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. त्यांची सुरक्षितता, त्यांना कुशल बनविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबरोबरच मजूरांसाठी खास डिझाईन केलेले लेबर क्वाटर्स, बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांच्या अंघोळी व शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणची साफसफाई, महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांसाठी बांधकाम ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था आदी गोष्टींचा विचार केला जाणार आहे. बांधकाम मजूरांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी लेबर रिलेशन ऑफिसर नियुक्त करण्याबाबतही विचार झाला पाहिजे. यातून बाहेरगावांहून, बाहेर राज्यांहून येणाऱ्या मजुरांमध्ये कामाविषयी आत्मीयता निर्माण होईल.सरकारच्या अटी, शर्तींमध्ये काही अडचणीही आहेत. त्याविषयी संघटनेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे अशी माहिती मर्चंट यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या सुपरवायझरना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्याची अडचण होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांना ओळखपत्र तसेच कंपनीचे एक पत्र देऊ. त्याला मान्यता मिळायला हवी. मजूरांचे त्यांच्या कुशलतेनूसार गट असतात. खोदाई करणार्यांचा गवंडी कामात ऊपयोग नसतो. अशा वेळी जिथे खोदाईची गरज आहे तिथे त्यांना नेण्याची परवानगी मिळायला हवी.लॉकडाऊन उठल्यानंतर रेड झोन मध्ये नसणाऱ्या बांधकाम क्षेत्रांना सरसकट सूट द्यावी अशी विनंती क्रेडाईने सरकारला केली असल्याची माहिती मर्चंट यांनी दिली.                      रणजीत नाइकनवरे म्हणाले, क्रेडाई बांधकाम कामगारांच्या मदतीस तत्पर आहे. त्यांना राज्य सरकारकडूनही मदत व्हावी. ती व्यवस्थित मिळावी यासाठी  प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने आपल्या कामगारांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.कोविड १९ नंतर या आधीचे बांधकाम क्षेत्र आणि नंतरचे बांधकाम क्षेत्र अशा पद्धतीने दोन भाग पडणार असून हा काळ बांधकाम व्यवसायिक, मजूर व क्षेत्राशी निगडीत अनेकांसाठी संकटाचा काळ असणार आहे. मात्र या मधून सर्वच जण फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील असा विश्वास जे. पी. श्रॉफ, आय. पी. इनामदार यांनी व्यक्त केला. -

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसायEmployeeकर्मचारी