शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या वाहनखरेदीवर बंधन नाही

By admin | Published: January 22, 2017 1:54 AM

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकायुक्त यांच्यासाठी त्यांच्या पसंतीनुसार शासकीय वाहनाची खरेदी करता येईल

मुंबई : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकायुक्त यांच्यासाठी त्यांच्या पसंतीनुसार शासकीय वाहनाची खरेदी करता येईल आणि त्याला किमतीची मर्यादा नसेल, असे राज्य शासनाने शनिवारी स्पष्ट केले. मंत्री, राज्यमंत्री, महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच सरकारी अधिकाऱ्यासाठी किती किमतीपर्यंतचे वाहन खरेदी करता येईल, याचा आदेश वित्त विभागाने जारी केला. त्यानुसार, विविध जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर येणारे कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, तसेच राज्य अतिथी यांच्या परिवहन व्यवस्थेसाठी २० लाख रुपये किमतीपर्यंतचे वाहन खरेदी करता येईल. त्यात हंगामी नोंदणी शुल्क, मूल्यवर्धित कर आणि साह्यभूत साहित्य (अ‍ॅक्सेसरीज) यांच्यासह त्या वाहनाची किंमत २० लाख रुपये असावी, ही अट असेल. कॅबिनेट मंत्र्यांसाठी व राज्यमंत्र्यांसाठी वाहन खरेदी करतानादेखील हीच अट असेल. पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्तांसाठी ८ लाख रुपयांपर्यंतचे वाहन खरेदी करता येईल. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व त्यावरील अधिकारी यांच्यासाठी ही मर्यादा ७ लाख रुपये राहील. शासकीय वाहन दिले जाते, अशा अन्य अधिकाऱ्यांसाठी ही मर्यादा ६ लाख रुपये इतकी राहील. (विशेष प्रतिनिधी)वाहनखरेदी मर्यादा- राज्याचे मुख्य सचिव, महाधिवक्ता, राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्यासाठी १५ लाखांपर्यंत किमतीचे वाहन खरेदी करता येईल. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आणि सचिव, राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य यांच्यासाठी ही मर्यादा १२ लाख असेल.