प्रियंकासह कुटुंबाच्या सुरक्षेत कपात नाही

By Admin | Updated: June 2, 2014 23:32 IST2014-06-02T23:32:39+5:302014-06-02T23:32:39+5:30

प्रियंका गांधी-वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना विमानतळावर सुरक्षा तपासणीमधून दिलेल्या सवलतीवरून निर्माण झालेल्या वादावर विशेष सुरक्षा दल(एसपीजी) लवकरच पडदा टाकणार आह़े

There is no reduction in family security with Priyanka | प्रियंकासह कुटुंबाच्या सुरक्षेत कपात नाही

प्रियंकासह कुटुंबाच्या सुरक्षेत कपात नाही

>शीलेश शर्मा - नवी दिल्ली
प्रियंका गांधी-वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना विमानतळावर सुरक्षा तपासणीमधून दिलेल्या सवलतीवरून निर्माण झालेल्या वादावर विशेष सुरक्षा दल(एसपीजी)  लवकरच पडदा टाकणार आह़े 
उच्चपदस्थ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, एसपीजी लवकरच आपले जुने नियम ‘जैसे थे’ ठेवण्याची शिफारस गृहमंत्रलयाकडे करणार आह़े सध्या एसपीजीच्या यादीत सामील नावांमध्ये कुठलीही कपात न करण्याची शिफारस यात आह़े तूर्तास ही शिफारस केवळ फायलींमध्ये असून गृहमंत्रलयाकडे पाठविण्यात येणार आह़े नागरी उड्डयनमंत्री गजपती राजू यांच्या एका विधानानंतर रॉबर्ट वड्रा यांना पुरविण्यात येणा:या विशेष सुरक्षेचा वाद ऐरणीवर आला होता़ गरज असेल तरच विमानतळांवर सुरक्षा दिली जायला हवी, असे राजू यांनी म्हटले होत़े त्यांचे थेट लक्ष्य रॉबर्ट वड्रा होत़े विशेष म्हणजे यानंतर खुद्द प्रियंका यांनी पत्र लिहून आपल्या पतीची सुरक्षा तपासणीतील सूट काढण्याची विनंती केली होती. यानंतर हा वाद आणखी पेटला         होता़ 
 
4नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर सुरक्षा तपासातून आपल्या कुटुंबाला मिळालेली सवलत काढून घेण्याची सूचना एसपीजीला केल्याच्या पाश्र्वभूमीवर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते, असा टोला हाणला. 
रिजीजू यांनी प्रियंका गांधी यांचा नामोल्लेख न करता म्हणाले की, कुणीही सुरक्षेचे राजकारण करायला नको. 
प्रियंका गांधी यांनी आपल्या कुटुंबाला विमानतळावर सुरक्षा तपासातून मिळत असलेली सवलत रद्द करण्याची सूचना एका पत्रद्वारे एसपीजी प्रमुखांना केली होती. रिजीजू यांना प्रियंका गांधी यांनी एसपीजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्रविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, याविषयीचा निर्णय सुरक्षा संस्थांवर सोपवणोच योग्य आहे. 
एसपीजी प्रमुख दुर्गा प्रसाद यांना पाठवलेल्या पत्रत प्रियंका गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमातील वृत्तांचा संदर्भ दिला होता, त्यात विमानतळावरील सुरक्षा तपासातून सवलत देण्यात आलेल्या व्हीव्हीआयपीच्या यादीतून रॉबर्ट वाड्रा यांचे नाव वगळण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. प्रियंकाने असे लवकरात लवकर झाल्यास चांगलेच आहे, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: There is no reduction in family security with Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.