शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 14:55 IST

विधानसभा  निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्यावरून धुसफूस दिसू लागली आहे.

मुंबई -  विधानसभा  निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्यावरून धुसफूस दिसू लागली आहे. एकीकडे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सारे आलबेल असल्याचे दाखवत आहेत. मात्र भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नसल्याचा दावा, चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. लोकसभेतील बंपर यशामुळे भाजपा आणि शिवसेनेला हुरूप आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातही भाजपामध्ये विरोधी पक्षामधून जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करण्याची गरज नाही, असे मानणाराही एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ''भाजपा आणि शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तसेच जागावाटप करताना याधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत.''त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामधून युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे.दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपले एकमेव लक्ष्य असून काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला होता.तसेच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही मागे घेतला का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, आपापलं काम करत राहायच असतं. तुम्हाला अनपेक्षीतपणे पद मिळत असतात. अध्यक्षपदी विराजमान होईल याची आपल्याला जाणीवही नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी फोन आला आणि, मंत्री व्हायचं सांगण्यात आले. त्यावेळी ठरवल सरकारमध्ये जायचं तर सरकारमध्ये किंवा अध्यक्ष व्हायच तर अध्यक्ष असं पाटील म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र