शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

वानखेडेंविरोधात बोलण्यास सरसकट मनाई आदेश नाही; नवाब मलिक यांचे ट्विट्स पूर्ववैमनस्यातूनच - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 2:14 PM

वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्या. जामदार यांनी म्हटले.

मुंबई - मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सार्वजनिक वक्तव्य किंवा ट्विट करण्यास सरसकट मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. सकृद्दर्शनी नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स हे द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आले. तथापि, वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात केलेले ट्विट हे एनसीबी विभागीय संचालकाच्या सार्वजनिक कर्तव्यांशी निगडीत आहे. त्यामुळे मंत्र्यांना वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यास पूर्णपणे मनाई करू शकत नाही, असे न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्या. जामदार यांनी म्हटले.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून नुकसानभरपाई म्हणून १.२५ कोटी रुपयेही देण्याची विनंती दाव्यात केली आहे.  मानहानी दाव्यावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आणखी बदनामीकारक वक्तव्ये करण्यास व समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास मलिक यांना मनाई करावी, अशी अंतरिम मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली होती. या बाबत आदेश देताना न्यायालयाने वानखेडे यांना दिलासा देण्यास नकार दिला.

बोलण्याचा मला  मूलभूत अधिकार सत्यमेव जयते. बोलण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अन्यायाविरुद्ध लढाई सुरूच राहील.- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

‘आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न’ -- मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले. तसेच आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे वानखेडे कुटुंबीयातील एका सदस्याने स्पष्टीकरण दिले. 

- मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याखाली कबूल है, ..कबूल है .. कबूल है..यह क्या किया तूने? असे नमूद केले. या फोटोमध्ये वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसतात. - मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले. आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे कुटुंबीयातील एका सदस्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडे