शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 09:52 IST

there is no tussle for cm post in mahayuti everything is sorted says devendra fadnavis to aaj tak

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी कुठल्याही प्रकारची रस्सीखेच होणार नाही. अशा कुठल्याही व्यवस्थेसाठी कुठल्याही प्रकारची आश्वासने देण्यात आलेली नाहीत. कारण आमच्याकडे आधीपासूनच पुढचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी एक पद्धत आहे. एकनाथ शिंदेंसह आमच्या युतीतील कुठल्याही नेत्याने पदाची मागणी केलेली नाही. सर्वांना विश्वास आहे की, निर्णय निष्पक्षपणे होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने सुरू केलेल्या जन कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीसाठी प्रो-इनकंबन्सी बघायला मिळते. मी अत्यंत आत्मविश्वासत दिसत असेल, मात्र महाराष्ट्राच्या विविध भागांत आमच्यासाठी वास्तविक जन समर्थन आहे. याचे श्रेय आम्ही लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांना जाते. आमच्या सरकारच्या गत अडीच वर्षात, लोकांनी विकास कामांचे प्रयत्न बघितले आहेत आणि हे सरकार सकारात्मक परिवर्तन आणेन असा विश्वास त्यांना आहे.

महाविकास आघाडीवर 'कटाक्ष' करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमच्या योजनांसंदर्भात बोलताना, या योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असा प्रश्न त्यांनी केला होता आणि आता आमच्याच योजनांद्वारे मिळणारा लाभ डबल  करण्यासंदर्भात बोलत आहेत." एवढेच नाही, तर आम्हाला केंद्राचे समर्थन आहे. ही मोठ-मोठी आश्वासनं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे कुणाचे समर्थन आहे?" असा प्रश्नही यावेळी फडणवीस यांनी केला.

'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "आम्ही विकास आणि आमच्या कल्याणकारी योजनांना निवडणुकीच्या केंद्रस्थानी ठेवू. 'बटेंगे तो कटेंगे' म्हणण्यात काहीही चूक नाही. कारण एक दुभंगलेला समाज विनाशाला सामोरे जातो. ते आज तक वृत्तवाहिनीशी बोलत होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीChief Ministerमुख्यमंत्रीElectionनिवडणूक 2024