शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:58 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

BJP Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आज महायुतीचे सरकार स्थापन होत असून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. अन्य मंत्र्यांचा शपथविधी आज होणार की त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहावी लागणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. शपथविधीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलेलं असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

"भारतीय जनता पार्टीसह महायुतीला या राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. ही निवडणूक व त्यातून जनतेने दिलेला कौल इतर अनेक निवडणुकांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे. जनादेश स्पष्ट आहे की, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रभूमीत खोटारडेपणाला, संधीसाधू वृत्तीला, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला अजिबात थारा नाही," अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.

दरम्यान, "महायुती सरकारच्या आजच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत - महंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्या माय - बाप जनतेने आजचा दिवस महायुतीच्या आयुष्यात आणला ती माय-बाप जनता महायुती सरकारला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणार आहे. महायुती सरकारला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व जनतेचे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो," असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

महायुतीचे समर्थक मुंबईत दाखल

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून महायुतीचे हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मंत्रालय परिसरात असलेली भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाची कार्यालये गजबजून गेली होती. सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. इतर मंत्र्यांचा शपथविधी याच सोहळ्यात होणार का याबाबत संभ्रम आहे. तरीही आपल्या नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश होईल या आशेने अनेक नेत्यांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीकडून मंत्रालय आणि आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी