शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
3
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
4
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
5
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
6
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
8
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
9
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
10
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
11
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
12
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
13
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
14
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
15
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
16
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
17
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
18
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
19
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?

'त्यांच्या' नशिबी रस्तेही नाहीत? १२ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:28 AM

रुग्णांना उपचारासाठी आणायचे असेल तरीही अनेक किलोमीटर चालत यावे लागते. मेटेवाडा गावातील एका १२ वर्षीय आजारी मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.  

लाहेरी (जि. गडचिरोली) :गडचिरोली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पूर्व टोकावरील भामरागड तालुक्यातील नागरिक स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आला तरी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. साधे रस्तेही त्यांच्या नशिबी नाहीत. त्यामुळे पायवाटेने प्रवास करण्याशिवाय त्यांना उपाय नाही. रुग्णांना उपचारासाठी आणायचे असेल तरीही अनेक किलोमीटर चालत यावे लागते. मेटेवाडा गावातील एका १२ वर्षीय आजारी मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.  मेटेवाडासारख्या कित्येक आदिवासी गावांमध्ये विकासाचा सूर्य उगवलेलाच नाही. सोमवारी दुपारी छत्तीसगड सीमेवरील त्या राज्याच्या हद्दीत येणाऱ्या मेटेवाडा येथील मुरी पांडू पुंगाटी (१२) या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला खाटेची कावड करून ३० किलोमीटर चालत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी  आणावे लागले. छत्तीसगडच्या हद्दीत येणाऱ्या नारायणपूर जिल्ह्यातील ओरसा तालुक्यातील मेटेवाडा या गावात १२ आदिवासी घरांची वस्ती आहे. ते लोक गवताचे झाडू बनवून लाहेरी व भामरागडच्या बाजारात अत्यल्प मोबदल्यात विक्री करून गुजराण करतात. लाहेरीपासून त्यांच्या गावाचे अंतर ३० किलोमीटर आहे. मार्गात मोठाल्या डोंगर-दऱ्या आहेत. त्या परिसरातील नागरिक दैनंदिन वापरातील वस्तूंसह सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लाहेरीच्याच बाजारात येत असतात. एवढेच नाही तर उपचारासाठीही लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय जवळचे दुसरे उपचार केंद्र नाही. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर