शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 26, 2020 13:58 IST

पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन...

पुणे : एक वर्ष होण्याआधीच ते कोल्हापूरला परत जाण्याची वक्तव्य करू लागले आहे. कोथरूडकरांनी त्यांना पूर्ण पाच वर्षांकरिता निवडून दिले आहे. या कालावधीत कोथरुडचे प्रश्न मार्गी लागावेत. आणि विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. उद्या नागरिक त्यांच्याकडे आपले काम घेऊन गेले तर ते म्हणायचे मी कोल्हापूरला परत जाणार आहे. पण मग परत जायचंच होतं तर पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना... अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला आहे. 

पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन. पण त्यांना कुणी पुणेकरांनी पुण्यात या असे बोलावलंच नव्हतं ना. पण एक झालं ते म्हणजे त्यांच्या पुण्यात येण्याने आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी व त्यांच्या कार्यकर्ते कारण नसताना नाराज झाले. 

पुण्यात अटल गौरव पुरस्कार सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख करत 'देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काही दिवस तरी जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. आता या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटलांनी त्यांचं काम करत राहावे आम्ही आमचे करत राहू. आम्ही त्यांना अजिबात त्रास देणार नाही. पण केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असे ते सांगतात तर आज तो रस्त्यावर का उतरला आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत देखील तिथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पुण्यात येऊन फडणवीसांनी फक्त बैलगाडीत फोटो काढले. पण बैलगाडीत फोटो काढण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन गोठणार्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलावं असा जोरदार टोला लगावला.तसेच दिल्लीच्या आंदोलनात महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी सहभागी झाले आहे हे देखील यावेळी पवारांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण