Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:14 IST2025-06-15T13:11:26+5:302025-06-15T13:14:45+5:30
Bachchu Kadu News: २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसणार, असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.

Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
तिवसा/ अमरावती: शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसांपासून सुरू होते. शनिवारी सातव्या दिवशी सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले. २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसणार, असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.
अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलके केले आहे. दिव्यांगांबाबत २५ मागण्या केल्या होत्या, त्यापैकी २० मागण्या मान्य करून घेतल्या. हे आंदोलनाचे मोठे यश आहे. आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल, तर २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी मंत्रालयावर मोर्चा काढू, अशा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंजात कडू यांचे सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते. सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती.
माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक मदत नसून समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत.