...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:20 IST2025-07-14T08:19:48+5:302025-07-14T08:20:33+5:30
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले. उद्धव ठाकरेंकडून सतत केल्या जाणाऱ्या एका विधानावर बोट ठेवत त्यांनी राऊतांना उलट सवाल केला.

...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका लेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्याला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उत्तर दिले. राऊतांच्या टीकेला उत्तर देताना रामदास कदमांनीउद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या जाणाऱ्या एका विधानाचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महायुती सरकारवर सामनातून टीका करण्यात आली. त्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सध्या मुख्यमंत्री मंत्रालय अलिबाग, उरणला नेतील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी याला उत्तर दिले.
तुम्ही सगळं विसरलात का? कदमांचा राऊतांना सवाल
रामदास कदम म्हणाले, 'तुमचे मालक उद्धव ठाकरे यांनी मंत्रालय मातोश्रीमध्ये आणून ठेवलं होतं, त्याचं काय? उद्धव ठाकरे अडीच वर्षामध्ये फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले. दहा-दहा मिनिटांसाठी आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मातोश्रीवर बसून मंत्रालयाचे कामकाज चालले होते. तुम्ही सगळं विसरलात का?", असा उलट प्रश्न रामदास कदम यांनी संजय राऊतांना केला.
"तुम्ही सगळं तुमच्या सोयीप्रमाणे घेत आहात का? ज्या उद्धव ठाकरेंनी मंत्रालय मातोश्रीमध्ये आणलं होतं. त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही भाजपला बदनाम का करत आहात?", असा सवाल रामदास कदम यांनी केला.
उद्धव ठाकरे बूट चाटत होते का? कदमांनी डिवचलं
"तुमचे मालक प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे दिल्लीला मोदीजींचे बूट चाटायला गेले होते. तुमच्या मालकांना विचारा, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन गेले होते दिल्लीला. मग त्यांनी आयडिया काय केली, अजित पवारांसह सगळ्या पक्षाच्या नेत्यांना केबिनमधून बाहेर घालवलं आणि मोदींसोबत २५ मिनिटं एकटेच बसले होते. मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?", असा पलटवार रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला.