...तर त्याला जबाबदार संतोष बांगर, एकनाथ शिंदे असतील; अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:52 IST2023-07-19T16:50:05+5:302023-07-19T16:52:20+5:30

शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला नेत्या अयोध्या पौळ यांनी हे ट्विट केले आहे. पौळ या सुरुवातीपासून बांगर यांच्या विरोधात आहेत, त्याना वेळोवेळी आव्हाने देत असतात. 

...then responsible for her will be Santosh Bangar, Eknath Shinde; Serious allegations of Ayodhya Poul patil | ...तर त्याला जबाबदार संतोष बांगर, एकनाथ शिंदे असतील; अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप 

...तर त्याला जबाबदार संतोष बांगर, एकनाथ शिंदे असतील; अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप 

मुंबई/हिंगोली - शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना भिडणाऱ्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या जिवाला काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे असतील असा इशारा पौळ यांनी दिला आहे. 

संतोष बांगर यांचा समर्थक तथा नगरसेवक राम कदम याने फोन करून अश्लिल भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच तुझे तुकडे तुकडे करून कुठे फेकून दिले तर कोणाला पत्ता लागणार नाही, अशा शब्दांत मला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. 

माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार गद्दार संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला नेत्या अयोध्या पौळ यांनी हे ट्विट केले आहे. पौळ या सुरुवातीपासून बांगर यांच्या विरोधात आहेत, त्याना वेळोवेळी आव्हाने देत असतात. 
 

Web Title: ...then responsible for her will be Santosh Bangar, Eknath Shinde; Serious allegations of Ayodhya Poul patil