शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर राष्ट्रवादी महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शकेल; जयंत पाटील यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.  प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  जयंत पाटील म्हणाले की, ''दिल्लीसमोर झुकायचं नाही हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. आता सर्व नवनिर्वाचित आमदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी सभागृहाच्या कामकाजात जास्तीतजास्त भाग घ्यावा. पुढची पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडत राहिले पाहिजे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल,''यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले काश्मीरचा मुद्दा मांडत राहिले. मात्र आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागांवर लढत जास्त जागा जिंकल्या आहेत. पक्षाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेच्या विधिमंडळ नेतेपदी अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र