Maharashtra Election 2019; मग मोदी, शहांच्या दहा - दहा, वीस - वीस सभा कशासाठी ?
By Appasaheb.patil | Updated: October 15, 2019 15:06 IST2019-10-15T15:02:22+5:302019-10-15T15:06:52+5:30
शरद पवार यांचा भाजप सरकारला सवाल...

Maharashtra Election 2019; मग मोदी, शहांच्या दहा - दहा, वीस - वीस सभा कशासाठी ?
सोलापूर : मागील पाच वर्षात तुमच्या सरकारनं चांगली कामे केली़ सगळे चांगले वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अन्य मंत्र्यांच्या दहा - दहा व वीस - वीस सभा कशासाठी घेता असा सवाल राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी केला.
अकलूज येथील प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील पाच वर्षात भाजप सरकारनं महाराष्ट्रातील जनतेची जपणूक केली नाही़ त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकºयांवर मोठया प्रमाणात अन्याय झाला़ राज्यात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या़ आजही भाजप सरकारला कळत नाही की नेमकं शेतकºयांना काय हवे ते असे हे भाजप सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे.
शरद पवार यांनी यावेळी अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अमित शहा यांनी सोलापुरात सभा घेतली़ त्यात ते म्हणाले की, शरद पवारजी आप बोलो की पिछले दस-पंधरा साल में आपने शोलापूर के लिए क्या किया ? अहो शहा जी मागील पाच वर्षे तुमची सत्ता होती, तुम्ही सांगायला हवे की पाच वर्षात काय केलं ते, आम्हाला काय केलं असा विचारण्याचा अधिकार तुमचा नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले़ याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अकलूजमधील मोहिते-पाटीलांच्या राजकीय प्रवासावर जोरदार टिका केली.