शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:06 IST

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबतही भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये जे जसं ठरलं होतं त्याप्रमाणे घडलं असतं तर मी आज मुख्यमंत्री झालो नसतो, असे त्यांनी सांगितले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये सध्या  महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.'' 

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हिंदुंनाही जड जाईल-  उद्धव ठाकरे

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणामी काय मागितले भाजपकडे? जे ठरले होते तेवढेच द्या. मी त्यांच्याकडे चांद-तारे मागितले होते काय? असा सवालही त्यांनी केला. ''तसेच मी अशाप्रकारे सत्तेत येईन असं मला आणि जनतेलाही कधीच वाटलं नव्हतं. तसं पाहिलं तर या खुर्चीत बसण्याची महत्त्वाकांक्षा मी कधी व्यक्त केली नव्हती. किंबहुना स्वप्नातही मी कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, पण आपण जे वागत असतो ते कोणीतरी अज्ञात शक्ती बघत असते असाच अर्थ यातून घ्यावासा वाटतो. ही एवढी मोठी जबाबदारी त्यामुळेच तर माझ्याकडे आली असावी. देशात अनेक राज्ये आहेत, पण हे जे मुख्यमंत्रीपद आहे ते इतरांपेक्षा मोठं आहे. मोलाचं आहे. कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. अशा महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मला बसवलं गेलं हे त्या शक्तीचेच आशीर्वाद आहेत, बाकी दुसरं काय!, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

र विधानसभेतून की परिषदेतून निवडणूक लढविणार या राऊतांच्या प्रश्नाला त्यांनी विधानपरिषदेचे संकेत दिले आहेत. राज्यात आता लगेचच विधानपरिषदेच्या निवडणुका येतील. विधानसभेवर जायचे म्हणजे जो निवडून आला त्याला राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक घ्यावी लागले. यामुळे माझ्यावरील जबाबदारी पार पाडण्यासाठी विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र