शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

...तर श्रमिकांचे पलायन टळले असते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:07 AM

एमएमआरडीएचे रेंटल हाउसिंग धोरण फसले; केंद्राकडून पुन्हा त्याच धोरणाची घोषणा

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील खुराड्यांमध्ये कोंबलेल्या श्रमिकांची व्यथा चव्हाट्यावर आली. त्यानंतर लगेचच या शहरी गरिबांसाठी भाडेतत्त्वावर घर उभारणीची घोषणा केंद्राने केली. याच उद्देशाने १२ वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सुरू केलेली ‘रेंटल हाउसिंग’ योजना बिल्डरधार्जिणीच ठरली. त्यातून गरिबांसाठी ८७ हजार घरांची उभारणी झाली, परंतु एकही घर भाडेतत्त्वावर दिले नाही. योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला नसता तर कदाचित मुंबई महानगर क्षेत्रातील श्रमिकांनी अशा पद्धतीने पलायन केले नसते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

एमएमआरडीएने रेंटल हाउसिंग योजना २००८ साली सुरू केली. तीन एफएसआयचे बांधकाम विक्रीसाठी व एक एफएसआयवर १६० चौ. फुटांची घरे विकासकाने एमएमआरडीएला मोफत द्यायची होती. ती भाडे तत्त्वावर गरिबांना देण्याचे नियोजन होते.

२००९ ते २०१४ दरम्यान ४७ बांधकाम प्रकल्प मंजूर झाले. त्यातून १६० चौरस फुटांची ८७,३१६ घरांची उभारणी होणार होती. पैकी ७५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले. बदलत्या सरकारी धोरणामुळे ही योजना भाडेतत्त्वाऐवजी ‘परवडणारी घरे’ अशी झाली. १६० चौरस फुटांच्या घरांचा निकष बदलून ३२० चौ. फूट केल्याने घरांची संख्या निम्मी झाली. ६०% घरे स्थानिक स्वराज्य संस्थांना संक्रमण शिबिरांसाठी देण्याचे ठरले. एमएमआरडीए, राज्य सरकारच्या तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, पोलिसांसाठी घरे राखीव ठेवली. उरलेली २७% पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना देत गिरणी कामगारांना त्यातील ५% घरे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे, रस्ते प्रकल्प विस्थापितांनाही ही घरे देण्याची घोषणा झाली आहे.

योजना गुंडाळलीचार एफएसआयच्या या योजनेतून बिल्डरांचेच हित साध्य होत असल्याचे लक्षात येताच २०१४पासून नव्या प्रस्तावांची मंजुरी बंद करून एमएमआरडीएने योजना गुंडाळली. दरम्यान, गरिबांच्या निवाऱ्यासाठी भाडेतत्त्वावरील घरांची योजना केंद्राने तयार केली असून त्याची घोषणा लवकरच होईल, असे केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी जाहीर केले. हे धोरण बिल्डरधार्जिणे नसावे, मूळ उद्देशापासून भरकटण्यास वाव नसेल ही काळजी घ्यावी लागेल, असे एमएमआरडीएतील एका अधिकाºयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस