शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

...आता 'काँग्रेस का हात दलालों के साथ' असेच म्हणावे लागेल : भाजपाचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 21:00 IST

केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी हिताचेच....

ठळक मुद्देकृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उपाध्ये यांंनी साधला माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद

पुणे: केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे, त्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचे स्वातंत्र्य देणारे आहे. काँग्रेस त्याला विरोध करत असेल तर हा पक्ष शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असे दिसते. त्यांच्या कृषी विधेयकाला विरोध करण्याच्या  भूमिकेमुळे 'काँग्रेस का हात दलालोंके साथ' असेच म्हणावे लागेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. 

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उपाध्ये यांंनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले, काँग्रेस या विधेयकाच्या विरोधात अपप्रचार करत आहे. ते सत्तेवर होते त्यावेळी त्यांनी कधीही शेतकऱ्यांना नडणारी आडते, दलाल ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी लागू केल्या नाहीत, त्या भाजपाने केल्या. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार हवा, तो कुठे, कोणाला, कसा विकायचा याची मुभा त्याला हवी. केंद्र सरकारने मंजूर केलेली तिन्ही विधेयके हेच करणारी आहेत असा दावा उपाध्ये यांंनी केला. 

काँग्रेसच्या विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस का हात दलालोंके साथ असेच दिसत असल्याचे उपाध्ये म्हणाले. बाजार समित्या, आडते, दलाल यांच्याबद्दल त्यांंना प्रेम का वाटते याचे उत्तर त्यांनी द्यावे. हा निर्णय एकदम घेतलेला नाही. या निर्णयामुळे बाजार समित्या बरखास्त होणार नाहीत, तर त्यांना आता स्पर्धा करावी लागणार आहे. पंजाबमधून विरोध होत आहे, पण तिथेही विधेयक समजून घेतले नाही हेच कारण आहे. भाजपाने निवडणुकीत शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकार ते पाळत आहे, काँग्रेस मात्र त्यांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांना हरताळ.फासत आहे असे उपाध्ये म्हणाले. शहर भाजपाचे सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे, कोषाध्यक्ष विनायक आंबेकर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार