शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

... तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, एलॉन मस्कचं ट्विट अन् फडणवीसांचं रिट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 16:51 IST

राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत

मुंबई - वेदांतानंतर नागपूरच्या मिहानमध्ये होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सरकाविरोधात जनमत तयार झालं आहे, त्यावरुन, फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी, काही पत्रकारांबद्दल त्यांनी HMV असा शब्दप्रयोग केला. महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून त्यांनी HMV पत्रकार आणि विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी, ट्विटरचा मालक एलॉन मस्कचं ट्विट रिट्विट करत त्यांनी, भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असे म्हटले. 

राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पुढे असून भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे हे सरकारवर तोफ डागत आहेत. त्यातच, काही पत्रकार आणि लेखकही सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवरील रोष व्यक्त करत आहेत. त्यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी HMV हा शब्दप्रयोग केला होता. आता, पुन्हा एकदा एलॉन मस्कच्या ट्विटला रिट्विट करत मिश्कीलपणे तीच भूमिका मांडली.   ट्रम्प ट्विटरवर परत येणार का असा मला ज्या-ज्या वेळी कोणी प्रश्न विचारला आहे त्या प्रत्येकाच्या प्रश्नामागे मला डॉलर मिळाला असता तर आज ट्विटरकडे बक्कळ पैसा असता असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं होतं. त्यांचं हेच ट्विट रिट्विट करून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, याच वाक्याला धरुन भाजपची भूमिका मांडली. ‘माझ्या आणि पक्षावरील प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असात तर आज भाजपाने बक्कळ पैसा कमावला असता’ असं देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे, फडणवीसांचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. 

काय म्हणाले होते फडणवीस

महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत, तरीही महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये, काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवाने एचएमव्ही पत्रकार, जे बोटावर मोजण्याइतके केवळ ४-५ आहेत. ह्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे, असे फडणवीसांनी म्हटले. यावेळी, एक पत्रकाराने HMV चा अर्थ विचारला असता, His Masters Voice म्हणजे त्यांचा बुलंद आवाज असा अर्थ फडणवीसांनी सांगितला. 

आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना एचएमव्ही म्हटल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हा पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. जे पत्रकार आमच्याविरोधातही लिहितात, बोलतात, त्यांनी यांच्याविरोधात लिहिलं तर त्यांना  His Master Voice म्हणणं हे अपमाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, नोकऱ्यांसाठी, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांना शेंबडी पोरं म्हणणं बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी शब्द मागे घेतले होते, आताही त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाTwitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क