शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता.

मुंबई, दि. 12 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. या अहवालात 122 पैकी 39 आमदारांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे समोर आले.  याशिवाय 23 पैकी 11 खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे अहवालातून समोर आलं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. 

जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपाच्या सर्वेक्षणातून पुढे आली असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे. कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.  

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो. 

तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं?  गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना विचारले असल्याचं समजतं आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMLAआमदार