शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:40 IST

महामानवांविषयी वाट्टेल ती विधाने करून गैरसमज पसरवायचे हा भाजपचा १०० वर्षांचा नियोजनबद्ध अजेंडा

कोल्हापूर : भाजप आणि राष्ट्रवादी हे मतांसाठी भांडत आहेत. इकडे एकमेकांवर टीका करायची आणि तिकडे कॅबिनेट बैठकीला मांडीला मांडी लावून बसायचे. सभांमध्ये एकमेकांना इशारे द्यायचे काम सुरू आहे ते १५ जानेवारीपर्यंत सुरूच राहणार, परंतु या आरोप-प्रत्यारोपात खरोखरच भाजपचे विचार पटत नसतील, तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.पाटील म्हणाले, लातूर येथे सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल अनुद्गार काढले आणि आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली. मी त्यांचा निषेध करतो. एका पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष असले, तरी त्यांच्यात प्रगल्भता नसल्याचे दिसून आले.

वाचा: सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

बिनविरोध निवडींबाबत तक्रारीची दखल घेणे वेगळे आणि कारवाई करणे वेगळे. निवडणूक आयोग फक्त आमची दखलच घेत आला आहे. कारवाई कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. पैशांचे आमिष, दबाव, गुंडगिरीने बिनविरोध निवडीचा हा नवा ट्रेंड महायुतीने सुरू केला आहे. तो यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला मान्य नाही.

हा तर भाजपचा १०० वर्षांचा अजेंडापाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महामानवांविषयी वाट्टेल ती विधाने करून गैरसमज पसरवायचे हा भाजपचा १०० वर्षांचा नियोजनबद्ध अजेंडा आहे.

आपण पुस्तके वाचून या महामानवांविषयी माहिती घेतली; परंतु आणखी ५० वर्षांनी सोशल मीडिया आणि डिजिटल फूटप्रिंटवरील माहिती त्या पुढच्या पिढीला खरी वाटणार आहे. त्यासाठीच खरा इतिहास पुसण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे हाेते, असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील बोलत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satej Patil Demands Ajit Pawar Resignation If BJP's Ideals Clash

Web Summary : Satej Patil urges Ajit Pawar to resign if disagreeing with BJP's ideology. He condemned BJP leaders' remarks about historical figures and criticized the unopposed election trend, alleging misuse of power by the ruling alliance to distort history.