शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपाच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 22:42 IST

ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं दानवेंनी सांगितले

मुंबई - राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. २०१९ च्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचे बिनसले आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणले. कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता अजित पवार यांनाही मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. त्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजितदादाही मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले आहे. 

मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या वेळीस काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढले, राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. राजकारणातील ही घटना सगळ्यांना माहिती आहे. दावा करणे आणि बहुमत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर बहुमताच्या बाजूने अजित पवार आले किंवा १०-२० वर्षांनी कधी त्यांना बहुमत मिळाले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले अजित पवार?‘२०२४ मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘२०२४ काय आत्ताही मुख्यमंत्री बनण्याची तयारी आहे. राज्याचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असं विधान करून अजित पवार यांनी धमाल उडवून दिली आहे. मात्र, कोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल, हे मात्र पवार यांनी सांगितले नाही. त्यामुळे गुढता कायम आहे. भाजपा प्रवेशाविषयी कोणताही खुलासा पवार यांनी केला नाही.

२००४ साली संधी गेलीराष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असंही अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारraosaheb danveरावसाहेब दानवेNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री