शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

'फोडाफोडीत त्यांचं आयुष्य, भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष...'; माणिकराव कोकाटेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:25 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपावर टीका केली.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात असल्याचे दिसत आहे. विधानसभेत एकत्र असलेले पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधात आहेत.  काही ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपविरुद्ध राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विरोधात शिंदे सेना अशा लढती आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 

शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत

सिन्नर येथील प्रचारसभेत बोलताना कोकाटे यांनी भाजपवर निशाणा साधला. "पूर्वी मंत्री नसताना सिन्नरच्या गल्लीबोळात फिरत होतो मात्र आता मंत्री झाल्यामुळे मला फिरता येणे शक्य नाही. मी राज्यात कुठेही फिरलो काहीही बोललो कसे बोललो. तरी सिन्नरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रात फिरत असताना मला हे जाणवले की सर्व लढाया आपसाआपसामध्ये सुरू आहेत. म्हणजे युतीमधे जास्त लढाया आहेत, जास्त संघर्ष युतीतच आहे. आपल्याकडे थोडासा उबाठा आहे. बीजेपी पूर्ण बाटलेली आहे इकडून फोड तिकडून फोड अशी परिस्थिती आहे. बीजेपीचे आयुष्य फोडाफोडी मध्ये चालले आहे, असा हल्लाबोल कोकाटे यांनी भाजपावर केला. 

यावेळी मंत्री कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाष्य केले. "शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका. शेतकऱ्यांना ७०% अनुदानावर योजना द्या. फुकट काहीच नको. फुकट दिलं की गोंधळ होतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी पुन्हा एकदा केले. कुठल्या निवडणुकीला मी अद्याप पर्यंत जातीपातीचे गालबोट लागू दिले नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत असे होऊ देणार नाही. मी श्री छत्रपती शिवरायांच्या विचाराचा माणूस आहे, असंही कोकाटे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manikrao Kokate Criticizes BJP: 'Their Life is in Splitting Parties'

Web Summary : NCP Minister Manikrao Kokate criticized BJP, stating their politics revolve around splitting parties. He advocated for subsidized schemes for farmers over loan waivers, avoiding caste-based politics, and following Shivaji Maharaj's ideals.
टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBJPभाजपा