शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणीपट्टी थकली, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सह्याद्री अतिथीगृहाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:36 IST

  मुंबई - राज्याचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांच्याच बंगल्यांची पाणीपट्टी थकल्याची बाब समोर आली आहे. तब्बल ९५ लाख १२ हजार ...

 मुंबई - राज्याचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांच्याच बंगल्यांची पाणीपट्टी थकल्याची बाब समोर आली आहे. तब्बल ९५ लाख १२ हजार रुपयांची ही पाणीपट्टी थकली असून मंत्र्यांच्या बैठका जिथे पार पडतात, त्या सह्याद्री अतिथीगृहाची ३५ लाख ९९ हजार रुपयांची पाणीपट्टी थकली आहे.

मुंबई महापालिकेकडून माहिती अधिकारात ही माहिती मिळाली असून आयटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही माहिती मागवली होती.  महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार थकबाकीदारांमध्ये मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा, नंदनवन बरोबरच उपमुख्यमंत्र्यांच्या सागर, मेघदूत व देवगिरी आणि अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांचीही पाणीपट्टी थकली आहे. 

निधीची तरतूद आधीच केली असून, धनादेश तयार आहेत, त्यामुळे ही थकबाकी त्वरित भरली जाईल, असे बांधकाम विभागाने सांगितले असले तरी थकबाकी एवढी झालीच कशी,  याचे उत्तर काही मिळत नाही.

९५ लाखांची वसुली करणार तर कधी?२०२१ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत या सर्व बंगल्यावरील पाण्याची एकूण थकबाकी ९५ लाख १२ हजार २३६ रुपये असून ही रक्कम मुंबई महानगरपालिकेने वसूल केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही पाणीपट्टी भरली जाते. याबाबत एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ही थकबाकी तातडीने भरली जाईल, असे सांगण्यात आले. 

बंगले    थकबाकी मुख्यमंत्र्यांचा वर्षा व नंदनवन    १८,४८,३५७ उपमुख्यमंत्री फडणवीस (मेघदूत, सागर)    २,७३,११८ वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी)    ४,३८,८५९वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी)    ६,५२,४९४ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन)    ९२,४२३ आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (चित्रकूट)    ५,१९,१४०ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन (सेवासदन)    १,५६,५२८ पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (जेतवन)    १,१८,३२४ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (रामटेक)    ११,३०,२४२उदय सामंत (मुक्तागिरी)    ६,८३,६३२सह्याद्री अतिथीगृह     ३५,९९, ११९

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबई