शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कोठडीतील मृत्यूंचे दाहक वास्तव; महाराष्ट्रात पाच वर्षात १०१ कैद्यांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: April 8, 2026 16:28 IST

Nagpur : तामिळनाडू येथील नऊ पोलिसांना 'कस्टडी डेथ' प्रकरणात मदुराई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील पोलिस कोठड्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे.

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तामिळनाडू येथील नऊ पोलिसांना 'कस्टडी डेथ' प्रकरणात मदुराई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील पोलिस कोठड्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. पोलिस कोठडीतील मृत्यूंच्या गुन्ह्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०१ कैद्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या आकडेवारीमुळे राज्यातील पोलिस कोठड्यांतील परिस्थिती, चौकशीच्या पद्धती आणि मानवाधिकारांच्या संरक्षणाबाबत विविध सवाल उपस्थित होत आहेत.

'लोकमत'ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ ते २०२५-२ या कालावधीत संपूर्ण देशात ८०६ 'कस्टडी डेथ'चे गुन्हे नोंदविले गेले. त्यातील १०१ गुन्हे एकट्या महाराष्ट्रातच नोंदविले गेले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये ८५ गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच पोलिसांच्या वर्तणुकीसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बिहार व उत्तर प्रदेशहून जास्त 'कस्टडी डेथ'ची नोंद महाराष्ट्रात झाली. बिहारमध्ये ७६ तर उत्तर प्रदेशमध्ये ५६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक पुरोगामी असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात अशा घटनांची संख्या जास्त असल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस संशयितांकडून चौकशीदरम्यान कबुलीजबाब मिळविण्यासाठी कधी कधी बेकायदेशीर आणि अमानुष पद्धतींचा वापर केला जातो. यामुळे काही वेळा गंभीर जखमा होऊन किंवा नैसर्गिक आजारपणात योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे आरोपींचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. 

२४ तासांत 'एनएचआरसी'ला माहिती देणे अनिवार्य

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीत झालेल्या प्रत्येक मृत्यूची माहिती २४ तासांच्या आत आयोगाला देणे बंधनकारक आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये शवविच्छेदन प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाच्या चौकशीत जर पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाला तर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस संबंधित राज्य सरकारला केली जाते.

नऊ पोलिस कर्मचाऱ्यांमुळे ऐरणीवर आला मुद्दा

कोरोना काळात तामिळनाडूमध्ये पोलिसांच्या कथित अमानुष मारहाणीमुळे व्यापारी वडील आणि मुलाचा कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना मदुराई सत्र न्यायालयाने कठोर भूमिका घेत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कस्टडी डेथच्या घटनांबाबत पुन्हा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming: 101 Custodial Deaths in Maharashtra in Five Years

Web Summary : Maharashtra recorded the highest number of custodial deaths in India, with 101 cases in five years. This raises concerns about interrogation methods and human rights protection. Guidelines mandate reporting deaths within 24 hours, with video-recorded postmortems and potential police accountability.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसDeathमृत्यूnagpurनागपूर