शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

लेटमार्क लावाल तर तुमची खैर नाही, राज्यातील शालेय बस नियमावली कडक होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 07:21 IST

राज्यभरातील शालेय बसेसची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना परिवहन आयुक्तांनी दिले आहे. 

मुंबई : शालेय बसचालक पॅनिक बटन आणि जीपीएस ट्रेकिंग, आदी नियमांकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यभरातील शालेय बसेसची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना परिवहन आयुक्तांनी दिले आहे. 

एप्रिल महिन्यात मुंबईतील पोदार इंटरनॅशनल शाळेची बस पाच तास बेपत्ता झाली होती. बसमध्ये १५ विद्यार्थी होते. विद्यार्थी वेळेत घरी पोहोचले नसल्याने पालकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये वाद होऊन मुंबईत बसची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर विद्यार्थी सुरक्षित आणि सुखरूपरीत्या घरी पोहोचले व पालकांच्या जिवात जीव आला. त्या बसवरील चालक नवीन असल्याने त्याला रस्ते माहीत नव्हते. शिवाय त्याचा फोनसुद्धा लागत नसल्याने हा गोंधळ उडाला होता. त्यामुळे शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली होती.  यासह अनेक घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे  आता परिवहन विभागाने केंद्रीय अधिसूचनेची प्रत जोडलेले शाळा बसेसवरील कारवाईचे आदेश राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठवले आहे. 

काय होणार तपासणी?

  • शालेय  बसमध्ये जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटण अशा यंत्रणा लावण्यात आल्या आहेत का? 
  • या यंत्रणा सुरू आहेत का? याशिवाय चालक प्रशिक्षित आहेत का? आणि शालेय बसेससाठी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का?
  • या दृष्टीने आता परिवहन विभागाकडून राज्यातील शाळेच्या बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.  

बस कशी असावी ?बसची यांत्रिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. नियमानुसार बस   १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. शाळेची बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहन हे पिवळ्या रंगाचे असावे.  बसच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांखाली आणि पुढे चॉकलेटी रंगाचा पट्टा असावा. या पट्ट्यावर शाळेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बस कंत्राटी असल्यास त्याचे तपशील पांढऱ्या रंगाने लिहिलेले असणे  आवश्यक आहे. 

मुंबईत रस्ते चांगले नाहीत. मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे  बसला उशीर होत आहे. आम्ही गाड्यांमध्ये  जीपीएस आणि सीसीटीव्ही लावले आहेत. अनधिकृत गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही.  आम्ही नियमांचे पालन करून गाड्या चालवत आहोत; तरीही त्रास दिल्यास संप पुकारला जाईल. अनिल गर्ग,अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीसMaharashtraमहाराष्ट्र