शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'अजितदादांच्या निधनाबद्दल रोहित पवार करत असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद’, अजित पवार गटाची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:11 IST

Anand Paranjpe Criticize Rohit Pawar: अजितदादा पवार यांच्या दु:खद आणि दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आणि घृणास्पद आहे,  अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे  - अजितदादा पवार यांच्या दु:खद आणि दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आणि घृणास्पद आहे,  अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व पार्थ पवार यांच्यासमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे, अशी मागणी केली होती. शिवाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती. मात्र दुर्दैवाने आमदार रोहित पवार गेले काही दिवस राजकारण करत आहेत त्याबद्दल आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली. 

आनंद परांजपे म्हणाले की, रोहित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून गुन्हा नोंदवला जाईल, असे आश्वस्त करुन देखील रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नेते, चार नेते अशाप्रकारचा आरोप रोहित पवार करत आहेत. खरंतर २ जुलै २०२३ मध्ये वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमचे दैवत अजितदादा पवार यांना कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा अजित  पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातील पवारांना मतदान करा, असे वक्तव्य वरिष्ठांकडून करण्यात आले होते याची आठवणही आनंद परांजपे यांनी करून दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत अत्यंत हताश होऊन कुटुंबाने मला एकटं पाडलं पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही ही उद्विग्नता दादांनी व्यक्त केल्याचा व्हिडिओ आजही सगळ्यांकडे पहायला मिळत असल्याचे सांगितले. 

आज अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारण केले जातेय. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, पार्थ, जय पवार यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रीय अधिवेशनात जय पवार यांना मागील खुर्चीत बसवण्यात आले अशा प्रकारचा चुकीचा व्हिडीओ माध्यमांमध्ये दाखवण्यात आला शिवाय तसा आरोप रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. मुळात अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू होते.  त्यावेळी सुत्रसंचालक सुरज चव्हाण हे जय पवार यांना पुढे बसण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नेत्यांवर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असेही आनंद परांजपे म्हणाले. 

महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे पण अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते नाही तर महाराष्ट्राने अजितदादांसारखं नेतृत्व मुकलंय ती महाराष्ट्रातील जनता सत्य बाहेर येण्याची आतुरतेने वाट पहात आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar faction slams Rohit Pawar for 'disgusting' politics over death.

Web Summary : NCP's Ajit Pawar group criticizes Rohit Pawar for politicizing Ajit Dada's unfortunate death. They demand a CBI inquiry while expressing displeasure over Rohit Pawar's actions, accusing him of exploiting the tragedy for political gain despite assurances from authorities.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस