शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

विरोधकांची कोंडी झाली, सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली; अभ्यासू आमदारांची उणीव जाणवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 07:08 IST

दिशा सालियन हत्या प्रकरणामुळे सभागृहात सत्ताधारी, विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली

महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क: विधिमंडळात विविध आयुधांच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारण्याची संधी आमदारांना मिळते. मात्र, या आयुधांचा वापर जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्याऐवजी राजकीय आरोप, प्रत्यारोप करण्यासाठीच केल्याचे चित्र विधान परिषदेत दिसले. चार दिवसांच्या होळीच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी आक्रमक झाले होते. विधानसभेपेक्षा विधान परिषदेत विरोधक अधिक एकवटतात असे दिसले.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांचा अविश्वास ठराव सभापती प्रा. राम शिंदे यांनी फेटाळून लावला. पदावरून दूर करण्यासाठीचे ठोस कारण आणि निकषांची पूर्तता केली नसल्याचे म्हणत विरोधकांची मतदानाची मागणीही नाकारली. विरोधकांना बोलू देत नाही असा आक्षेप घेत विरोधकांनी सभापती राम शिंदे यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदनही दिले. त्याच दिवशी दिशा सालियन हत्या प्रकरणामुळे सभागृहात सत्ताधारी, विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली.

अभ्यासू उमेदवारांची उणीव

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा, माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेत वाढ करणारे, महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा, महाराष्ट्र महामार्ग सुधारणा, महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अशी महत्त्वाची विधेयके सभागृहात मांडण्यात आली असता त्यावर मोजक्याच सदस्यांनी मते मांडली.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेRam Shindeराम शिंदेDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरण