शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 05:44 IST

Eknath Shinde News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि इतर कारणांवरून खटके उडताना दिसत आहेत. यादरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि इतर कारणांवरून खटके उडताना दिसत आहेत. यादरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे.  “महायुतीतील सर्व घटक एकदिलाने काम करत आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपावर कोणतेही भांडण नाही. आमचा एकच अजेंडा आहे. तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मार्गावर नेणे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “हिंदुत्वाची विचारधारा आमची समान आहे. आमचे रंग भगवे आहेत. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी नव्हे, तर विचारधारेसाठी एकत्र आलो आहोत. शिवसेना आणि पतित पावन संघटनेचे विचार एकसारखे असून, दोन्ही संघटना एकत्र आल्याने भगवा अजून बळकट होणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारी पक्षसंस्था आहे, तर पतित पावन संघटना देखील त्याच भूमिकेतून कार्य करते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक निवडणुकांतही जनता आमच्याबरोबर उभी राहील. आमचा अजेंडा हा जागांचा नाही, तर विचारांचा आणि विकासाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत विचारल्यावर शिंदे म्हणाले, “या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. चौकशी सुरू असून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. कुठलाही गैरप्रकार सरकार सहन केला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही. राज्यात महार वतनाच्या जमिनींबाबत नव्या नियमावलीचा विचार सुरू असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. “या प्रकरणांमध्ये न्याय्य तोडगा काढला जाईल,” असेही  शिंदे यांनी स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance united for Maharashtra's development, no disputes: Eknath Shinde

Web Summary : Eknath Shinde affirmed the alliance's unity, prioritizing Maharashtra's development. He emphasized shared Hindutva ideology and commitment to progress, addressing land irregularities with promises of transparent investigation and fair solutions.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahayutiमहायुती