शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या आचरणाचे ठरणार 'नियम'; नऊ सदस्यीय विशेष समितीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:14 IST

लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर असणार समितीचा 'वॉच'

सावंतवाडी : आमदारांनी दौऱ्यांदरम्यान कसे वागावे आणि त्यांचे सार्वजनिक आचरण कसे असावे, यासाठी विधिमंडळाने नऊ सदस्यीय विशेष समिती गठित केली आहे. या समितीत सावंतवाडीचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या सुसंस्कृत आणि अभ्यासू प्रतिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.भाजपचे आमदार चैनसुख संचेती या समितीचे अध्यक्ष असून, यात सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच पक्षांतील अनुभवी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. आमदारांच्या अभ्यासदौऱ्यांवर अनेकदा होणारी टीका लक्षात घेता, ही समिती आता वर्तणुकीची नवी नियमावली (Code of Conduct) तयार करणार आहे.

सुसंस्कृत स्वभावाची 'पावती'दीपक केसरकर हे त्यांच्या संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. राजकीय वादळातही त्यांनी आपली सुसंस्कृत प्रतिमा जपली. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांची या समितीत वर्णी लावली आहे.

कोकणातील दोन 'शिलेदार'विशेष म्हणजे या समितीत कोकणातून दीपक केसरकर यांच्यासोबतच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचाही समावेश आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर यांसारखे दिग्गज नेतेही या समितीत आपले योगदान देतील.

शिस्तीची नवी 'चौकट'अनेकदा दौऱ्यांदरम्यान लोकप्रतिनिधींच्या वागण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आता ही समिती दौऱ्यातील शिष्टाचार निश्चित करेल. आमदारांच्या वर्तणुकीसाठी स्पष्ट नियमावली आखेल. विधिमंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Conduct Rules Set; Nine-Member Special Committee Announced

Web Summary : A nine-member committee, including Deepak Kesarkar, will formulate conduct rules for MLAs during tours and public interactions. Aim is to address criticisms and create a code of conduct, ensuring disciplined behavior and upholding legislative decorum.