"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:39 IST2025-12-17T12:36:13+5:302025-12-17T12:39:08+5:30
"आमची अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला हवे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत..."

"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
आमची अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला हवे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत आणि निवडणूक आयोग हमारखोर असल्याने, जो पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. कायदा यांच्या कोठीवर नाचतोय. जोवर दिल्ली आणि निवडणूक आयोगात, हरामखोरांचे राज्य आहे, तोवर हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल," असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते मुंबईत प्रत्रकारांशी बोलत होते.
नुकतेच संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंह म्हणाले, पक्षांतरबंदी कायदा आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्यांनी शिवसेना आणि शरदपवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं उदाहरण दिलं. जे लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा लोकप्रतिनिधींवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यावर बंधी घाला, अशीही मागणी केली, असे विचारले असता, राउत म्हणाले, "अशा प्रकारचे कठोर निय आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यात आहेत. पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल..., आमची अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला हवे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत. आणि निवडणूक आयोग हमारखोर असल्याने, जो पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही."
राउत पुढे म्हणाले, "पक्षांतरबंदी कायद्याच्या घटनेतील १० व्या स्केड्यूल नुसार, मिंधेंबरोबर गेलेले ४०-४२ लोक अपात्र ठरायलाच हवे होते. हे घटनेच्या १० व्या स्केड्यूलमध्ये असतानाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, हरामखोर निवडणूक आयोगाने केला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केला. अशा वेळी कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय. नाचायला लावतायत हे. हे सर्व लोक दौलतजादा करत आहेत."
"दिग्विजय सिंह यांची तळमळ मी समजू शकतो. कारण मध्यप्रदेशातही काँग्रेसला अशाच पद्धतीने फोडण्यात आले. ज्योतिरादित्य शिंदेंसोबत जे २२-२३ आमदार फुटले, तेव्हाही तेच झाले, सरकार पाडले गेले. महाराष्ट्रातही तेच झाले. झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे पक्षांतरबंदी कायदा कितीही कठोर केला तरी, जोवर दिल्ली आणि निवडणूक आयोगात, हरामखोरांचे राज्य आहे, तोवर हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल," असेही संजय राऊत म्हणाले.