शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:58 IST

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजत आहे. विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न करत आहेत. यातच, "पूर्वी, जसा मिसा  कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जनसुरक्षाकायदा आणण्यात आला आहे. मला असे वाटते की, याचे नाव 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे," असे म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. ते पत्रकारांसोबत बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "विधमंडळात जन सुरक्षा कायदा, या नावाने एक कायदा आणला जात आहे. काल खालच्या सभागृहात तो बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे आणि ते त्याचा उपयोग अथवा दुरुपयोग करत आहेत. याला आमचा विरोध का आहे? ते आमच्या सदस्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे."

...मात्र, या विधेयकात नक्षलवाद अथवा दहशतवाद उल्लेख नाही -"सरकारच्या कथीनी आणि करणीमध्ये फरक दिसत आहे. ते सांगताना सांगत आहेत की, नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. मात्र, या विधेयकात, कुठेही नक्षलवाद अथवा दहशतवाद असा उल्लेख नाही. सुरुवातीला केवळ 'कडव्या डाव्या वीचारसरणीच्या संघटनांना' असे लिहिले आहे. खरे तर, आता डावे आणि उजवे यातील फरक कळण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे त्यावेळी शिवसेना आणि भाजप आम्ही सोबत होतो. आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत. कारण आम्ही धर्म माणणारे आहोत.  

 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे - उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "पूर्वी, जसा मिसा  कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जनसुरक्षाकायदा आणण्यात आला आहे. मला असे वाटते की, याचे नाव 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे. कारण भाजप विरोधात जो बोलेल, तो जणू काही देशद्रोही आहे, असा काही त्याचा समज आहे." 

"जर देश विघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर, आम्हाला विचारण्याची गरज नाही. आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार. मात्र तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे विधेयक आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय. कारण मी म्हटले तसे, यात कुठेही नक्षलवाद, वैगेरे वैगेरे असा काही शब्दच नाहीये. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, "आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही याला जरून समर्थन दिले असते अथवा देऊ, पण तुम्ही त्यातील जे शब्द आहेत, त्यात सुधारणा करा. त्यात स्पष्ट शब्दात देश विघातक कृती करणारे, देश द्रोही, नक्षलवादी, यांचा उल्लेख करा आणि पुन्हा विधेयक आणा. पण जर असे मोहगम विधेयक आणले की, ज्याला काही शेंडा बुडूख नाही की, धर आणि उठ सुट टाक आत." एवढेच नाही तर, "ज्या पद्धतीने टाडाचा दुरुपयोग केला गेला की, आमच्या पाक्षात ये नाही, तर तुला टाडाखाली टाकतो. तसाच याचा दुरुपयोग होईल," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा