"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:58 IST2025-07-11T18:56:40+5:302025-07-11T18:58:21+5:30

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

The Jan suraksha Bill should be renamed BJP suraksha Bill says Uddhav Thackeray also mentions MISA and TADA act and attacks the government | "जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजत आहे. विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न करत आहेत. यातच, "पूर्वी, जसा मिसा  कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जनसुरक्षाकायदा आणण्यात आला आहे. मला असे वाटते की, याचे नाव 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे," असे म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. ते पत्रकारांसोबत बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "विधमंडळात जन सुरक्षा कायदा, या नावाने एक कायदा आणला जात आहे. काल खालच्या सभागृहात तो बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे आणि ते त्याचा उपयोग अथवा दुरुपयोग करत आहेत. याला आमचा विरोध का आहे? ते आमच्या सदस्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे."

...मात्र, या विधेयकात नक्षलवाद अथवा दहशतवाद उल्लेख नाही -
"सरकारच्या कथीनी आणि करणीमध्ये फरक दिसत आहे. ते सांगताना सांगत आहेत की, नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. मात्र, या विधेयकात, कुठेही नक्षलवाद अथवा दहशतवाद असा उल्लेख नाही. सुरुवातीला केवळ 'कडव्या डाव्या वीचारसरणीच्या संघटनांना' असे लिहिले आहे. खरे तर, आता डावे आणि उजवे यातील फरक कळण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे त्यावेळी शिवसेना आणि भाजप आम्ही सोबत होतो. आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत. कारण आम्ही धर्म माणणारे आहोत.  

 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे - 
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "पूर्वी, जसा मिसा  कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जनसुरक्षाकायदा आणण्यात आला आहे. मला असे वाटते की, याचे नाव 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरतक्षा' करायला हवे. कारण भाजप विरोधात जो बोलेल, तो जणू काही देशद्रोही आहे, असा काही त्याचा समज आहे." 

"जर देश विघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर, आम्हाला विचारण्याची गरज नाही. आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार. मात्र तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे विधेयक आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय. कारण मी म्हटले तसे, यात कुठेही नक्षलवाद, वैगेरे वैगेरे असा काही शब्दच नाहीये. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, "आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही याला जरून समर्थन दिले असते अथवा देऊ, पण तुम्ही त्यातील जे शब्द आहेत, त्यात सुधारणा करा. त्यात स्पष्ट शब्दात देश विघातक कृती करणारे, देश द्रोही, नक्षलवादी, यांचा उल्लेख करा आणि पुन्हा विधेयक आणा. पण जर असे मोहगम विधेयक आणले की, ज्याला काही शेंडा बुडूख नाही की, धर आणि उठ सुट टाक आत." एवढेच नाही तर, "ज्या पद्धतीने टाडाचा दुरुपयोग केला गेला की, आमच्या पाक्षात ये नाही, तर तुला टाडाखाली टाकतो. तसाच याचा दुरुपयोग होईल," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

 

Web Title: The Jan suraksha Bill should be renamed BJP suraksha Bill says Uddhav Thackeray also mentions MISA and TADA act and attacks the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.