शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची वाहतूककोंडी! उलट्या दिशेने ताफा घुसला, सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:22 IST

विरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडीचा जाच रोजचाच आहे. या महामार्गावर झालेले ५०० निरपराध मृत्यू आणि दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेले लोक एक दिवस रस्त्यावर उतरतील, अशी भीती पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. आज मी वाहतूककोंडीत सापडलो असताना तो संताप मी नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहिला. त्यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास अनेक गोष्टी बेचिराख होतील, असेही ते म्हणाले.

पालकमंत्र्यांविरोधात समाजमाध्यमांवर नाराजीविरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. परंतु, मुंबईकडे सुरळीत सुरू असणारी वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचलेपालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी  घरातून पहाटे सहा वाजता निघालेले पालकमंत्री गणेश नाईक हे घोडबंदर ते वसईदरम्यान  वाहतूककोंडीत सापडले. अखेर विरार ते सफाळे असा रोरो जलवाहतूक सेवेचा आधार घेत ते ८:१५ तासांनी बैठकीला पोहोचले. अशाप्रकारे पालघरवासीयांच्या वेदनांच्या झळा पालकमंत्र्यांना भोगाव्या लागल्या.

व्हीसीद्वारे चर्चा करून व्यक्त केली नाराजीमहामार्गावरील वाहतूक पोलिस विभागाच्या पोलिस अधीक्षक आणि मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्तांशी व्हीसीद्वारे चर्चा करून नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या महामार्गावर आजपर्यंत सुमारे ५०० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, या वाहतूककोंडीमुळे एखादे लहान मूल आणि महिलेचा उपचारांअभावी होणारा मृत्यू हा महाराष्ट्राला शोभनीय नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शाळकरी विद्यार्थ्यांचे हालमुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुककोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांनाही सोसावा लागला. मंगळवारी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या १० ते १२ बसेस वाहतूककोंडीत अडकून पडल्या. यात काही दादर येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.  दरम्यान, याप्रकरणी पालकमंत्र्यांनी वाहतुककोंडीचा स्वतः अनुभव घेतल्यानतंर बुधवारी विविध बैठकांमध्ये राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Minister stuck in traffic, enters wrong way, late to meeting.

Web Summary : Minister Naik faced traffic gridlock on Mumbai-Ahmedabad highway, echoing citizen's daily plight. He warns of public anger due to constant delays and fatalities. Arrived 8 hours late for a meeting after using a ferry, then criticized traffic police.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकTrafficवाहतूक कोंडी