शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:18 IST

सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला ...

सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. बुधवारअखेर (दि. ५) या योजनेची थकबाकी १,५७७ कोटी ७२ लाख २३ हजार ६८० हजार रुपयांवर पोहोचली.यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले. या निधीतून रुग्णालयांची थकबाकी अदा करावी, असे आदेशात म्हटले आहे.सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदायी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना निधीटंचाईच्या गर्तेत सापडली होती. या योजनेतून उपचार करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांना जुलै २०२४ पासून छदामही देण्यात आलेला नाही. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सामान्यत: दीड ते दोन महिन्यांत पैसे अदा होतात; पण सध्या मात्र आठ महिन्यांपासून पैशांची प्रतीक्षा आहे. परताव्यासाठी रुग्णालये शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

  • योजनेतील राज्यभरातील रुग्णालये - १,६६१
  • जुलै २०२४ पासून थकबाकी - १,५७७ कोटी ७२ लाख,
  • सांगली जिल्ह्यातील रुग्णालये - ६० जुलै
  • २०२४ पासून थकबाकी - ५९ कोटी रुपये

जिल्हानिहाय थकबाकी अशी

जिल्हा  थकबाकी (कोटींमध्ये)
अहिल्यानगर९८ कोटी १४ लाख
अकोला३५ कोटी ६० लाख
अमरावती४६ कोटी
बीड२० कोटी
भंडारा ४ कोटी
बुलडाणा२० कोटी
चंद्रपूर५ कोटी
छत्रपती संभाजीनगर ११३ कोटी
धाराशिव ७ कोटी
धुळे ४५ कोटी
गडचिरोली१ कोटी
गोंदिया७ कोटी
हिंगोली३ कोटी
जळगाव४२ कोटी
जालना २८ कोटी
कोल्हापूर९० कोटी
लातूर २४ कोटी
मुंबई आणि उपनगरे १२७ कोटी
नागपूर  १०६ कोटी,
नांदेड४३ कोटी
नंदुरबार६ कोटी
नाशिक१८७ कोटी
पालघर७ कोटी
परभणी ५ कोटी
पुणे ११५ कोटी
रायगड२९ कोटी
रत्नागिरी१८ कोटी
सातारा४६ कोटी
सिंधुदुर्ग७ कोटी
सोलापूर ७१ कोटी
ठाणे९८ कोटी
वर्धा३९ कोटी
वाशिम  १४ कोटी
यवतमाळ १२ कोटी

 

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारfundsनिधी