शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-राष्ट्रवादीत पहिला खडा! अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात निधीवरून खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 08:31 IST

Ajit pawar Vs Girish Mahajan Clash News: सत्ताधारी पक्षांमधील मतभेद आले समोर; ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवारांनी महाजनांना विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत आपल्या विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी महाजन यांना विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘नको तिथे खर्च नको’आपल्या गटाचे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधींची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळात मांडला होता. हा धागा पकडत ‘नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला?’ असा सवाल गिरीश महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

योजनांसाठी कर्ज काढण्याची शक्यताराज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात जवळपास १ लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. प्रसंगी या योजनांसाठी सरकारला कर्ज काढावे लागण्याची शक्यता असल्याने वित्त विभागाची सध्या कसरत सुरू आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस