शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल?

By संदीप प्रधान | Updated: February 20, 2023 06:56 IST

भाजपचे हिंदुत्व वैचारिक अधिष्ठान असलेले आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे झुलीसारखे पांघरलेले असल्याने वरवरचे व लवचिक आहे.

भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्रात २७ ते २९ टक्के मते असून लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत निश्चित केलेले लक्ष्य गाठायचे तर भाजपला आपल्या मतांची टक्केवारी ४५ टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. याचा अर्थ भाजपला आपल्या मतांच्या टक्केवारीत १७ ते १९ टक्के वाढ करायला हवी. २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मिळवली व भाजपला टांग दिली. ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली १९ टक्के हिंदू मते भाजपकडे खेचून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. मात्र शिवसेनेचे व भाजपचे हिंदुत्व व दोन्ही पक्षांचा हिंदुत्ववादी मतदार यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. 

ठाण्यातील नौपाड्यातील भाजपचा मतदार आणि कोपरीतील शिवसेनेचा मतदार किंवा घोडबंदर रोडवरील भाजपचा मतदार आणि कळव्यातील शिवसेनेचा मतदार यात केवळ फरक नाही तर काही प्रमाणात संघर्ष आहे. हा संघर्ष हीच ठाण्याच्या तसेच अन्य शहरांमध्ये शिवसेनेची व्होटबँक ताब्यात घेण्यातील अडसर आहे. केवळ मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना व्यापक जनाधार प्राप्त करून सत्ताधारी होणार नाही हे जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले तेव्हा त्यांनी हिंदुत्वाची झूल शिवसेनेवर चढवली. आपण हिंदुत्ववादी नेते असल्याचे जनमानसावर ठसवण्याकरिता ठाकरे यांनी भगवी वस्त्रे परिधान केली, हातात रुद्राक्षाच्या माळा घेतल्या. बाळासाहेब हे व्यंगचित्रकार असल्याने त्यांचा टायमिंग सेन्स जबरदस्त होता. बाबरी पडल्यावर ती शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा करून त्यांनी भाजपच्या मंडळींचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावला.

भाजपचे हिंदुत्व वैचारिक अधिष्ठान असलेले आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे झुलीसारखे पांघरलेले असल्याने वरवरचे व लवचिक आहे. त्याचाच राजकीय फायदा उद्धव ठाकरे यांनी मविआ स्थापन करताना उठवला. शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार हा नोकरदार आहे. भाजपचा मतदार असलेल्या धनाढ्य व्यक्तींकडे तो कामाला आहे किंवा उच्चशिक्षित व्यक्तींच्या हाताखाली काम करीत आहे. आर्थिक, सामाजिक पातळीवर किंवा अगदी खाण्यापिण्याच्या सवयींवरूनही या दोन मतदारांमध्ये दीर्घकालीन संघर्ष आहे. त्यामुळे ठाण्यात नौपाड्यातील भाजप मतदारांच्याबरोबरच कोपरीतील शिवसेनेच्या मतदाराला आपल्याकडे वळवून  ४५ खासदार निवडून आणणे हे निश्चित आव्हान आहे.

भाजपचा हिंदुत्ववादी मतदार आणि शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार यात मोठा फरक आहे. भाजपचा पूर्वापार मतदार हा धनाढ्य, उच्च जातीचा व उच्चशिक्षित आहे. शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार हा मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. वेगवेगळ्या समस्यांनी घेरलेल्या या मतदाराला स्वत:च्या समाधानाकरता, आनंदाकरता सत्यनारायणाची पूजा घालावी, कर्मकांड करावे, असे वाटते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यसनाधीनतेवर, आर्थिक विवंचनावर मात करण्याकरिता संत, महापुरुष यांचा आधार घ्यावा असे वाटते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाHindutvaहिंदुत्व