शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
4
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
5
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
6
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
7
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
8
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
9
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
10
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
12
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
13
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
14
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
15
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
16
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
17
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
18
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
19
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
20
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:29 IST

विधानभवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून काही मान्यवर आमचे इतके आमदार आहेत, असा दावा करतात. मात्र, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पालकमंत्री नसतानाही या जिल्ह्याची कामे सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांनी हा प्रश्न विचारू नये, असे सांगत स्वपक्षीय मंत्री छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. विधानभवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कामकाज सुरळीत चालू

नाशिक व रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व राष्ट्रवादीत वाद उफाळला आहे. गोगावले यांनी या पालकमंत्री पदावर शिंदेचा दावा असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर आता त्यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर अप्रत्यक्षपणे दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

रायगडमध्ये केवळ एक

आमदार असताना राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळाले होते. नाशिकला राष्ट्रवादीचे ७आमदार असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता  लकमंत्री नेमण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नसतानाही तेथे कोणतीही अडचण आलेली नाही. तेथील कामे सुरळीत सुरू आहेत. असे  पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस