शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:32 IST

विधान परिषद सभापतीपद; फैसला नागपूर अधिवेशनात; निवडणूक झाल्यास भाजपला करावी लागेल २९ मतांची तजवीज

मुंबई - विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे कसे घेता येईल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. सध्या रिक्त असलेल्या या पदावर भाजपच्या सदस्याची निवड करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त आहेत. सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. भाजपकडे २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागतील, म्हणजे आणखी सात मतांची गरज लागणार आहे. रासपचे महादेव जानकर हे नाराज असले तरी ते भाजपसोबत असतील, असे मानले जाते. अपक्ष व लहान पक्षांच्या मदतीने हे संख्याबळ गाठता येईल का, याची चाचपणी केली जात असल्याचे समजते. 

भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर चर्चेतमाजी मंत्री राम शिंदे यांचे नाव भाजपकडून सभापती पदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याशिवाय प्रवीण दरेकर यांचेही नाव आहे. पण दरेकर यांना विस्तारात मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते. शिंदे यांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदासाठीही आले होते.

सभापतीपद भाजपकडे यावे यासाठी प्रयत्न विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे घेण्यात भाजपला विशेष स्वारस्य आहे. नागपूर अधिवेशनात पहिल्या एक-दोन दिवसातच सभापतीपदाची निवड करावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे कायम ठेवून विधान परिषद सभापती पदासाठी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात. राज्यपाल नियुक्त १२, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत.

असे आहे संख्याबळ

भाजप - २२

शिवसेना (उबाठा) - ११

राष्ट्रवादी - ९ 

काँग्रेस - ८

जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी - १

अपक्ष - ४ 

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishadविधान परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन