शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:19 IST

पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

घेऊन... रानात गुंतलेले प्राण अवचित रानामध्येच हरपावेत तसे मराठी कवितेतले हिरव्या बोलीचे शब्द अचानक अबोल झाले. निसर्गावर भरभरून प्रेम करणारा, काळ्या मातीच्याच शब्दगंधात बेहोषून जाणारा रानकवी दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. कविवर्य ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली असं नाही तर रानारानातून बहरलेला हिरवा निसर्गच आतून आतून गलबलून गेला. पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी महानोरांनी अखेरचा श्वास घेतला. पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

शेतकऱ्यांचे सुखदुःख शब्दाशब्दांतून पेरणाऱ्या महानोरांच्या रानातल्या कविता लोकलयीतून आलेल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळणाऱ्या... कधी त्या पावसाळी कविता म्हणून भेटतात तर कधी वही बनून निसर्गाची विविध रूपं मोरपिसासारख्या हृदयाच्या खोल कप्प्यातून फुलारत राहतात. कधी आकाशीचे पक्ष्यांचे लक्ष थवे पाहत दयाघनाला प्रार्थना करतात, तर कधी पानझडीचे शल्य मांडताना तिची कहाणी सांगत राहतात. लोकसंस्कृतीचा निखळ प्रवाह महानोरांच्या कवितांमधून वाहत राहिला आणि त्यात मराठी रसिकमन आबादानी होत राहिले. पण, सहजसुंदर या कवितांचा अचानक थांबलेला हा प्रवास रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. महानोरांच्या शब्दांत सांगायचे तर...  

रसिकांचे उदास झालेले मन जणू काही महानोरांच्या याच ओळी आठवत असेल... दूरच्या रानाला लागीर उन्हालापारंबीचा झुला गेला झुलत नभाला...आज उदास उदास दूर पांगल्या सावल्याएकान्ताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्याकाही केल्या करमेना, कसा जीवच लागेनाबोलघेवडी साळुंकी आज शब्दही बोलेना.... 

शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाजजोंधळ्याला चांदणे लगडून यावे, असे म्हणणारे महानोर निव्वळ कवीच नव्हते तर हाडामांसाचे शेतकरी होते. म्हणूनच तर शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाज त्यांनी जसा रसिकांच्या दरबारात पोहोचवला तसाच तो शासनदरबारीही पोहोचवला. दोन वेळा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 

हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लक्तरलेले, दुःख घेऊन चालत आले... असे म्हणत त्यांनी खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांचे वास्तव सातत्याने मांडले. महानोरांना या शेतानेच असा काही लळा लावला की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो म्हणत त्यांचा जीवच जखडला आणि रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द होऊन गेला. या हिरव्या बोलीनेच मराठी रसिकांच्या काव्यजाणिवा साठोत्तरी काळात प्रगल्भ होत गेल्या. आज ही बोली शांतावली असली तरी अक्षरे चुरगाळून अमृताचे कुंभ प्यायलेली महानोरांची कविता रसिकांच्या सोबत असेल. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेAurangabadऔरंगाबादMarathi Songsमराठी गाणी